banner-slider
banner-slider
banner-slider
banner-slider
|| सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ||

श्री तुळजाभवानी देवी भक्तांना माझा नमस्कार..!

श्री तुळजाभवानी मातेच्या सर्व भक्तांसाठी www.udaykadam.in ही माझी स्वतःची वेबसाइट सुरू करताना मला खूप आनंद होत आहे, जेणेकरुन श्री तुळजाभवानीदेवी भक्तांना पूजा विधींची सविस्तर माहिती व देविचा इतिहास , देविचा धार्मिक प्रसार आणि तुळजापुर मंदिर मधील सेवा सुविधा व इतर स्वरूपाची माहिती या वेबसाईट द्वारे मिळेल.

मी श्री उदय किरण कदम , श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य भोपे पुजारी आहे . तसेच भाविक भक्तांच्या इच्छेनुसार श्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक पूजा विधी व सेवा आमच्या मुख्य भोपे पुजारी मार्फत केल्या जातात. भाविक भक्ताना आपली सेवा व उपासना अखंडित राहावी. श्री तुळजाभवानी देवीचे कुलधर्म कुलाचार आपल्यास करता यावे या साठी भक्तांच्या सेवेसाठी या बेसाईट च्या माध्यमातून श्री तुळजाभवानीच्या धार्मिक पूजा विधींची सविस्तर माहिती व इतिहास धार्मिक प्रसार आणि मंदिर मधील सेवा सुविधा व इतर स्वरूपाची माहिती संकलित करून भाविकांच्या सेवेत सादर करत आहोत. तसेच Youtube, Facebook,Instagram यावर देखील आपन श्री तुळजाभवानी देविच्या माहिती संकलित करून भाविकांच्या सेवेत सादर करत आहोत. आई तुळजाभवानीची कृपा आपल्यावर व परिवारातील सर्व सदस्यावर राहो हीच जगदंबे चरणी प्रार्थना ।।

आम्हांला माहिती आहे की, देवीचे परम भक्त असले तरी काही वैयक्तिक अडचणींमुळे ते मंदिराला भेट देऊ शकत नाहीत आणि दुसरे म्हणजे असे अनेक भक्त आहेत जे परदेशात राहून त्यांची सेवाविधी पार पाडण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन, त्यामुळे तुळजापूर येथे असलेल्या देवी श्री तुळजाभवानी मातेशी भाविकांना जोडण्यासाठी ही वेबसाइट सर्वोत्तम सोयीस्कर व्यासपीठ असेल. "तुमच्या सर्व इच्छा तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि समाधानाने पूर्ण होवोत, अशी मी देवीला प्रार्थना करतो

Shri Tuljabhavani History Video

मुझे मां तुळजाभवानी की पुजा करने का अधिकार कैसे मिला ।
श्री तुळजाभवानी देविला मांसाहारी नैवेद्य का दाखवतात ? । नवरात्रीमध्ये देविचा नेवेद्य कसा असतो
तुळजाभवनी मुर्ती का रहस्य और मुर्ती की सारी जानकारी ।
श्री तुळजाभवानी माता का चमत्कारी चिंतामणी की कहाणी । क्या सच मे चिंतामणी का जवाब सही होता है ? नक्की
श्री तुळजाभवानी मुर्ती सिमोल्लंघन उत्सव 2022 Live दर्शन
श्री तुळजाभवानी देविचा प्राचीन खजाना कसा आहे? आणि सर्व अलंकाराची माहिती। तुळजाभवानी अलंकार पुजा |

रथ अलंकार पुजा

भगवान सुर्य नारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजा भवानी मातेस दिला याचे प्रतीक म्हणून ही पुजा मांडली जात असते.

मुरली अलंकार पुजा

महिषाशूरास देविने नऊ दिवस अविरत पणे युध्द खेळून ठार केले.दैत्याच्या छळा पासून देविने ऋषीमुनी व देवदेवतांना मुक्त केले.यावेळी देविला श्रीकृष्णाने आपली मुरली अर्पण केली.श्री तुळजा भवानी मातेनीं ती मुरली वाजवून भयमुक्त करून पुर्वरत पणे स्वर्ग प्राप्तीचा आनंद देवता गण घेवू लागले.

शेषशाही अलंकार पुजा

भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैय्येवरती विश्राम घेत असताना मातेने त्यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला.या वेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला पासून दोन दैत्य उत्पन्न झाले. शुंभ व निशुंभ असे ते दोन दैत्य. ते लगेच शेषशैय्येवरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागलेत्यावेळी नाभीतून बाहेर येण्यास देविची स्तूती करून जागविले व तिने त्या दैत्यास ठार मारले.म्हणून भगवान विष्णूनीं आपली शेषशैय्या श्री देविस विश्राम करण्यासाठी दिली.म्हणून ही अवतार पुजा मांडली जाते.

भवानी अलंकार पुजा

छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी व स्वराज्य स्थापन करण्यासाठी श्री तुळजा भवानी माता प्रसन्न होवूनआपल्या हाताने भवानी तलवार देवून आर्शिवाद दिला.ती हि भवानी तलवार अलंकार पुजा.

महिषासुर मर्दिनी अलंकार पुजा

ज्यावेळी स्वर्ग लोकांतून महिषासुराने सर्व देव देवता गणास हाकलून दिले व एकटाच स्वर्गाचा आनंद घेवू व भोगू लागला.साक्षात पार्वती अवतार असलेली आई तुळजा भवानी माता सर्व देवतांच्या व ब्रह्म विष्णू महेश यांच्या तेजातून उत्पन्न झालेली हीच ती भवानी दुर्गा.हिनेच नऊ दिवस महिषासुराशी युध्द खेळून विजय संपादन करून ठार मारले.याची ही अलंकार पुजा मांडली जात असते.

Online Pooja Seva

श्री कुलदेवतेला शांत करण्यासाठी अभिषेक करावा. अखंड सौभाग्यासाठी भोगी करावी. घरपरपंच भरभरारीसाठी कुलदेवतेला नैवैद्य दाखवावा. घरात शुभकार्य असल्यास आहेर करावा. समृद्धि धंदा / व्यवसाय नोकरीतील यशासाठी सिंहासन भरावे. घरातील वाद कलह शांत करण्यासाठी गोंधळ पूजा करावी. सेवा तन मन धनाच्या सुखासाठी जोगवा वाढावा, परडी भरावी. अपत्य प्राप्तीसाठी जावळ नवस करावा. घर, वास्तू, संपत्तीचे काम होण्यासाठी पानाचे घर घालावे. वाईटापासून सुरक्षेसाठी दैत्याला नैवैद्य दाखवावा.